लागणारे साहित्य:
पाऊण वाटी खवलेला ओला नारळ,१ चमचा फोडणीची मिरची,३ मध्यम वाट्या पातळ पोहे,कोथिंबीर,लिंबू,१ मध्यम कांदा,२-३ चमचे तेल,फोडणीसाठी मोहोरी, हिंग,हळ्द आणि मीठ चवीनुसार
कसे तयार कराल:
पोहे पातेल्यात थोडे भाजून घ्यायचे. ज्यामुळे ते थोडे चुरचुरीत होतात.
कढल्यात २-३ चमचे तेल गरम करावे मोहोरी, हळद, हिंग घालून फोडणी करावी.भाजलेले पोहे परातीत घ्यावे. त्यात तयार केलेली फोडणी घालावी. नंतर कांदा, ओला नारळ, फोडणीची मिरची, मीठ, चवीपुरती साखर, लिंबू घालावे आणि चांगले चुरून घ्यावे. सर्व पोह्यांना घातलेली फोडणी आणि मिरचीचे लोणचे लागले पाहिजे. जर तिखटपणा जास्त हवा असेल तर लाल तिखट किंवा बारीक चिरलेली मिरची घालावी.सर्व एकत्र करून ७-८ मिनीटे पोहे दडपून ठेवावेत.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार