१२/१७/२०१९

तारकर्ली बीच






महाराष्ट्राचे वरदान असलेल्या प्रचंड लांबीच्या कोंकण किनाऱ्यावर भ्रमंतीचा योग जुळून आल्यास मालवण शहरानजीकच्या तारकर्ली गावाला अवश्य भेट द्या आणि आयुष्यातील निदान एक रात्र निसर्गाच्या व सागराच्या सानिध्यात व्यतीत करा. मालवण पासून साधारण ७ कि.मी.वर असलेल्या नयनरम्य तारकर्ली गावातील निसर्ग पहाताना, स्कुबा डायव्हिंग करताना आणि जिभेचे चोचले पुरवताना मिळणारा आनंद तुमची रात्र नक्कीच स्मरणीय करील.कोंकण किनाऱ्यावर फिरताना तेथील सागर-पुत्र अर्थात कोळी समाजाची जीवन शैली जाणून घेणे हा एक रंजक अनुभव असेल. तारकर्ली, महाराष्ट्रातील एक सुंदर गाव तुम्हाला तो अनुभव देण्यास सुसज्ज आहे. पर्यटकांसाठी तारकर्ली येथे विवीध प्रकारची जेवणा-खाण्याची व राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.

तारकर्ली येथे पोहोचण्याचे मार्ग:

विमानाने: १९० कि.मी. दाभोली-गोवा एअरपोर्ट
रेल्वेने: ४५ की.मी. कुडाळ रेल्वे स्टेशन
मोटरगाडीने: ७ की.मी. मालवण पासून, ५४० की.मी. मुंबई पासून.

तारकर्ली काय पहाल:

MTDC च्या कोंकणी झोपड्या (Konkani huts)
मालवणी जेवण आणि मालवणच्या खास मच्छी पाकक्रिया
स्कुबा डायव्हिंग - स्नोर्कलिंग
किल्ले: पद्म्गड आणि सिंधुदुर्ग किल्ला







संदर्भ:https://www.facebook.com/YevaKonkanAaplochAasa
लेखक :anonymous
छायाचित्रे:लक्ष्मीबाग बोयझ

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search