१२/१९/२०१९

मुंबई - पुणे अस्तित्वात येण्याआधीचा भारत !



हा भारताचा नकाशा अब्राहम ऑर्टेलियस या बेल्जीयन नकाशाकाराने इ स १५५० च्या आसपास काढला आहे.

नकाशा आजच्या नकाशाशी तंतोतंत जुळत नसला तरी तत्कालीन उपलब्ध माहिती आणि तंत्राच्या आधारे बनवलेला आहे हे लक्षात घेऊन त्यातील लहान भौगोलिक चुका स्वीकारायला हव्यात.

नकाशातील काही सुप्रसिद्ध ठिकाणे -

१. मध्यभागी वरच्या बाजूला सिंधू नदी Indus A Indu नावाने नमूद केली आहे
२. त्याच्या खालीच Moltan म्हणजे आजचं पाकिस्तानातील मुलतान शहर आहे
३. अजून खालच्या बाजूला Mandao म्हणजे मध्य प्रदेशातला प्रसिद्ध मांडू किल्ला आहे
४. त्याच्या उजव्या बाजूस खाली Orixa म्हणजे ओरिसा , त्याच्या बाजूला DELLI म्हणजे दिल्ली आहे
५. खालच्या बाजूस DECAN म्हणजे दक्खनेचा प्रदेश आहे
६. दक्खन भागात चौल , दाभोळ ,गोवा ठिकाणे दिसत आहेत , सह्याद्री सुद्धा बऱ्यापैकी अचूक दाखवलाय
७. दक्षिणेत BISANAGAR म्हणजे विजयनगर दाखवलेलं आहे
८. दक्षिणेतले मंगळूर ,कोचीन सुद्धा दिसत आहेत

सध्या जरी हा नकाशा उपयोगाचा नसला तरी त्याकाळात असणारी शहरे,साम्राज्ये वगैरे अभ्यासण्याचा दृष्टीने उपयुक्त आहे

© आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search