लागणारे साहित्य:
लहान वांगी पाव किलो,गोड मसाला तीन चमचे ,तिळाचा कूट सात-आठ चमचे ,भाजलेल्या खोबऱ्याची पूड सात-आठ चमचे,मध्यम आकाराचे कांदे दोन-तीन,लाल तिखट आवडीप्रमाणे,फोडणीसाठी मेथीचे दाणे पाव चमचा, तेल अर्धी वाटी,अर्धी वाटी कोथिंबीर,लसूण पाकळ्या पाच-सात , आलं पाव इंचापेक्षा कमी .
मसाल्यासाठी कांदे उभे चिरून तेलावर परतून घ्याव नंतर आलं , लसूण , कांदा वाटून घ्यावा या वाटणात तिलकूट , खोबऱ्याचा कूट मिसळून त्यात चवीपुरत मीठ घालावं त्यातच भरपूर कोथिंबीरही घालून सारण तयार करावं ,
कसे तयार कराल:
आधी वांगी धुवून घ्यावीत आणि त्याचे देठ काढू नये .देठ खात नाहीत पण देठासकट भाजी छान दिसते.
आता वांग्याच्या रुंद गोलाकार भागावर असा छेद करून कापून घ्या . या छेदामध्ये वरील प्रमाणे बनवलेला मसाला भरावा .सगळी वांगी भरल्यावर पैन अथवा पसरट भांड्यात अर्धी वाटी तेलाची फोडणी करावी आणि त्यात एक-एक वांगं व्यवस्थित सोडावं.प्रेशरपैनचं वापरत असल्यास झाकण लावल्यास थोडा वेळाने पैनचा आवाज आल्याबरोबर गैस बंद करावा . नाहीतर भाजी जास्त शिजेल .आणि पसरट भांडे वापरत असल्यास वरीलप्रमाणे वांगी ठेवून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी . वांगी शिजण्यास वेळ फार जास्त लागत नाही .नंतर भाजी भांड्यामध्ये काढल्यावर वरून मेथीचा तडका द्यावा आणि ज्वारी अथवा बाजरीचा भाकरीबरोबर किंवा जेवणा तोंडी लावण्या करत सर्व करा.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार