ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर, असा लौकिक जव्हारला प्राप्त झाला असून तेथील हवामान, निसर्गसौंदर्य पाहता हा लौकिक सार्थ वाटतो. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र असून या परिसरात वारली लोकांची संख्या अधिक आहे.
सह्याद्रीलाच संलग्न असलेल्या लहानमोठ्या डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी जव्हारचा परिसर व्यापलेला असून जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहानमोठ्या धबधब्यांनी ओलाचिंब असतो.
जव्हारच्या परिसरात खूप काही पाहण्यासारखे आहे. उदा. पूर्वीच्या राजाचा राजवाडा-जयविलास पॅलेस, दादर-कोप्रा फॉल, हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, भूपतगड, शिर्पा माळ ही ठिकाणं इतिहास प्रसिद्ध असून याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी सुरतेवरील स्वारीच्या वेळी तळ ठोकला होता. वारली लोकांची हस्तकला आणि चित्रकला यासाठी जव्हारचा परिसर प्रसिद्ध आहे.
नजीकचे रेल्वे स्टेशन : इगतपुरी किंवा नाशिक (म.रे.), डहाणू (प.रे.)
इगतपुरी-जव्हार : ६१ कि.मी.
नाशिक-जव्हार : ८० कि.मी., डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.
संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous