११/०५/२०१७

खाण्याच्या सवयींवर तुमचं स्वास्थ्य अवलंबून...






आजच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे खूप दुर्लक्ष करताना आढळतात. भूक लागली तर जे मिळेल त्यानं आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करतात. 
या खाद्यपदार्थांचा आपल्या शरीरावर, स्वास्थ्यावर काय परिणाम होईल, याची चिंता ते करताना दिसत नाहीत. स्वास्थ्य कायम राहण्यासाठी तुम्ही काहीही खाल्लं तरी त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होणं गरजेचं आहे. त्यासाठी, तुम्हाला वेळो-वेळी तुमच्या डाएटमध्ये बदल करत राहणं गरजेचं आहे.  
स्वास्थपूर्ण राहण्यासाठी तेलकट-तूपकट पदार्थांपासूनच थोडं लांब राहिलेलंच उत्तम... तिखट, मसालेदार आणि बाजारात मिळणारे चटपटीत पदार्थ तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात.  
त्याचप्रमाणे, सिगारेट आणि तंबाखू उत्पादनंही तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. ते तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहचवतात. तसंच ते ‘एन्जाइम्सला’ही सक्रिय करतात. ज्यामुळे, तुमच्या त्वचेवर वयाच्या अगोदरच सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्यामुळे, तुम्हाला म्हातारपणाअगोदरच म्हातारं दिसायचं नसेल तर ताबडतोब सिगारेट आणि तंबाखूचे पदार्थ फेकून द्या.  
मोठ्या प्रमाणावर चहा किंवा कॉफीचं सेवनही तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरतं. अनेकदा चिंतेत, तणावाखाली किंवा कामाच्या प्रेशरमुळे आळस घालवण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफीचं सेवन करत असाल. याचाच शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.
जर, मित्रांसोबच बीचवर किंवा पार्टिमध्ये दारूचं व्यसनं तुम्ही सोडवू शकत असाल तर ही गोष्ट लवकरात लवकर अंमलात आणा. कारण, दारुमुळे तुमच्या लिवरवर खूप वाईट परिणाम होतो. सोबतच, याचा परिणाम तुमच्या फिटनेसवरही जाणवतो.  





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search