विजा चमकत, धो धो पाऊस पडत होता,
का कुणास ठावूक,
होऊनी भावूक तो रडत होता...
.
नेहमीपेक्षा तिला अर्धा तास उशीर झाला होता,
तिच्या उशिरा येण्याने जीव कासावीस होत होता...
.
ती दिसली येताना,
त्या अवघड वळणावरून पाणी निथळत होते तिच्या लालसर कपड्यावरून...
.
खूपच सुंदर दिसत होती ओलीचिंब होऊन अलगद पाणी सारीत होती डोळ्यावरून..
.
जशी जशी ती जवळ येत होती,
काळजामध्ये कालवाकालव होत होती..
.
तिला पाहून मी जरासा पुढे केला हात,
न थांबताच तशीच निघून गेली घाई घाईत...
.
वैतागून मी पण ओरडलो,
का रे थांबवत नाही..
बसकंडक्टर हि ओरडून म्हणाला,
मागून येत आहे रिकामी बस....