लागणारे साहित्य:
अर्धा किलो टोमॅटो,एक चमचा तांदूळ पिठ,दोन तमालपत्र,एक लहान चमचा जिरं,अर्धा
चमचा जिरपूड,एक चमचा तिखट,एक चमचा तूप,हिंग,दिड चमचा साखर,चवीपुरते मिठ,कोथिंबीर
कसे तयार कराल:
सर्व प्रथम टोमॅटो एका कूकरमध्ये शिजवून
घ्यावेत कमीत कमी तीन शिट्या घ्यावात थंड झाले कि त्यांची साले काढून घ्यावीत. तांदूळ पिठ अर्धा वाटी पाण्यात गुठळ्या न
होत्या मिक्स करून घ्यावे.थंड झालेल्या
टोमॅटोचा देठा कडचा भाग काढून टोमॅटो मिक्सरमध्ये घालावेत त्यातच कालवलेले
तांदूळपिठ, तिखट, साखर, मीठ घालावे, आणि सर्व एकत्र
करून मिक्सरवर वाटून घ्यावे. हे करताना जास्त पाणी घालू नये नंतर हवे तेवढे पाणी
घालू शकता.ही टोमॅटोची पातळसर प्युरी चाळणीवर गाळून घ्यावी, म्हणजे टोमॅटो सूपमध्ये कसल्याच गुठळ्या, बिया राहणार नाहीत. गाळलेल्या रसात अर्धा चमचा
जिरपूड, दोन तमालपत्र घालावे. गाळलेले मिश्रण
उकळण्यासाठी पातेल्यात काढून घ्यावा.लहान पळीत एक चमचा तूप गरम
करावे. जिरे, हिंग घालून फोडणी करावी. वरून टोमॅटो सूपला फोडणी
द्यावी आणि थोडावेळ उकळावे आणि वरून कोथिंबीर घालावी आणि टोमॅटो
सूप तयार.
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous