लागणारे साहित्य:
दोन बटाटे उकडून सोलून तुकडे करून,दोन वाटी साबुदाणा दोन तास भिजलेला,एक चमचा मीठ,दोन हिरव्या मिरच्या ,कढीपत्ता सात ते आठ पाने ,लाल मिरची पावडर पाव चमचा ,दाण्याचा कूट जाडसर एक छोटी वाटी ,दही चार चमचे ,
एक चमचा ,ओवा पाव चमचा (हवे असेल तर ), तळण्यासाठी तेल.
कसे तयार कराल :-
आधी बटाट्याचे तुकडे,साबुदाणा,मीठ,हिरवी मिरची , दाण्याचा कूट,जिरे,ओवा,लाल मिरची पावडर सर्व दही घालून मिक्स करून घ्यावे.आता ह्याचे लहान लहान गोळे
तयार करून तेलात तळून घ्या तळत असताना साबुदाने जास्त वेळ तळू नये त्यामुळे साबुदाने वाफ पकडून फुटतात आणि तेल अंगावर उडू शकते याची काळजी घ्या बस आणि गरम गरम बटाटा साबुदाणा वडा तयार.
हे वडे दही चटणी सोबत सर्व करा
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous