Log onto http://www.savetheinternet.in to email to TRAI and spread the message by sharing this video
इंटरनेटर नवनवीन संकल्पना घेऊन तरूण उद्योजक उभे राहत असतांना नेटीझन्सच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम टेलिकॉम कंपन्या करतायत, याविरोधात नेटकऱ्यांनी नेट न्यूट्रॅलिटी मोहिम सुरू केली आहे.
अनेक नेटधारकांनी याची तक्रार ट्रायकडे (दूरसंचार नियामक प्राधिकरण) मेल पाठवून केली आहे. काही सेलिब्रिटींनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नेट न्युट्रॅलिटी आंदोलनात जास्तच जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आलंय.
नेट न्युट्रॅलिटीचे म्हणजे काय?
१) सर्व वेबसाईट्स एकसारख्याच उपलब्ध असाव्यात
२) सर्व वेबसाईट्सचा वेग (डाऊनलोड स्पीड) एकसारखाच असावा
३) प्रत्येक वेबसाईटच्या वापरासाठी एकसारखेच शुल्क आकारावेत
नेट न्युट्रॅलिटीतून काय साध्य करायचे आहे?
१) ठरावीक वेबसाईटचा वेग (डाऊनलोड स्पीड) वाढविला जाऊ नये. वेगवेगळ्या वेबसाईट्समध्ये दुजाभाव नको.
२) काही वेबसाईट्स शुल्कमुक्त करून इतर वेबसाईट्वर जादा शुल्क नको.
३) युजर्सनी कोणती वेबसाईट पाहावी, यावर नियंत्रण नको.
इंटरनेट वाचवण्यासाठी ट्रायला मेल करा, वेबसाईटवर लॉग इन करा http://www.savetheinternet.in/
संदर्भ: AIB Youtube.com
छायाचित्रे:#Internet