२/१७/२०१५

त्या शिवाय कळत नाही


ओढ म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....
● प्रेम म्हणजे काय ते स्वतः
केल्याशिवाय कळत नाही.....
● विरह म्हणजे काय ते प्रेमात
पडल्याशिवाय कळत नाही.....
● जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही.....
● दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग
झाल्याशिवाय कळत नाही.....
● सुख म्हणजे काय ते दुसर्यांच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही.....
● समाधान म्हणजे काय ते आपल्यात
शोधल्याशिवाय कळत नाही.....
● मैत्री म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....
● आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही.....
● सत्य म्हणजे काय ते डोळे
उघडल्याशिवाय कळत नाही.....
● उत्तर म्हणजे काय ते प्रश्न
पडल्याशिवाय कळत नाही.....
● जबाबदारी म्हणजे काय हे त्या
सांभाळल्याशिवाय कळत नाही..
● काळ म्हणजे काय हे तो निसटून
गेल्याशिवाय कळत नाही.....
● मृत्यू म्हणजे काय हे तो समोर
आल्याशिवाय कळत नाही....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search