गंधित तू अशी, भ्रमारेही भ्रमावे
कोडे तुझ्या सौंदर्याचे जणू न उमजावे
व्याकूळ होऊनी चित्ती गंधर्व हि झुरावे
तुला पाहताना मी धुंद व्हावे....
स्पर्श होता मनी, हृदयी रंग भरावे
अशी तू परी, अंतरी तू फुलावे
धुंदीत मी उभ्या जगास विसरावे
तुला पाहताना मी धुंद व्हावे....
सांग रे मन मौन का न भंग व्हावे
माधुर्य प्रीतीचे तुला का न कळावे?
कधी अंतरी, कधी समोरी तू दिसावे
तुला पाहताना मी धुंद व्हावे....
हलकेच तुझे शब्द हृदयी स्मरावे
गंध प्रीतीचे मंद मंद पसरावे
जणू रातराणी सवे काजवेही मुग्ध व्हावे
तुला पाहताना मी धुंद व्हावे....
- नितीनकुमार