वय कधी निघून गेले कळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही
खूप झाल्या भेटीगाठी अन् बघण्याचा कार्यक्रम
चहा पोहे बिस्कीटात निघुन गेले मोसम
पसंतीचे सूर काही मिळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही
गृहशांती मंगळशांती पितृशांती केली
एवढी तपश्चर्या ही न फळास आली
पञिकेचे सकंट काही टळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही
आता वाटे सगळे सोडूनीया द्यावे
भगवे वस्त्र लेवूनिया हिमालयी जावे
न कळे पुण्य कसे फळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही.