कळलेच नाही मला मी कधी तिच्या प्रेमात पडलो
नजरा नजर फक्त अन डायरेक्ट जाऊन भिडलो
तिला रोज पाहायचो शाळेत जाताना
जाता जाता मंदिरात फुले वहाताना
तिच्या मुळेच मंदिराच्या पायरया मी चढलो
कळलेच नाही मला मी कधी तिच्या प्रेमात पडलो
तिच्या भेटीसाठी रस्त्यात असायचो उभा
दिवसाच मोजत राहायचो चांदणे मी नभा
कितीदा तरी मी आकाश धर्तीच्या पाया पडलो
कळलेच नाही मला मी कधी तिच्या प्रेमात पडलो
ती जाताना माझ्याकडे पाहत लाजत हसायची
मला भर उन्हाळ्यात वीज चमकलेली दिसायची
तिला पाहता पाहात कित्येकदा नालीत मी पडलो
कळलेच नाही मला मी कधी तिच्या प्रेमात पडलो
तिच्या घरा समोर आमची सभा भरलेली आसायची
ती कधी कधी ग्यालारीत चांदणीवाणी दिसायची
मित्राच्या नादानी मी हरबरयाच्या झाडावर चढलो
कळलेच नाही मला मी कधी तिच्या प्रेमात पडलो
खुणवून तिला मी देणार होतो हवेतून मुका
पहिले तिच्या बापाने अन ठोकल मला लेका
आज तिच्या आठवणीत रात्रभर हुस्मू हुस्मू रडलो
कळलेच नाही मला मी कधी तिच्या प्रेमात पडलो
****:सतिष मुरकुटे:****
९७६३०७६७२५