मी मेल्यावर अर्थीजवळ उभी रहा
मी मेल्यावर अर्थीजवळ उभी रहा,
अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा..
आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही,
तो मेला आहे..त्याचा हट्ट धरायचा नाही,
आग विझल्यावर मग थोडी जवळ जा..
कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा,
स्वःताला सांग व्हायचं ते होऊन गेलं..
वेड्याचं आयुष्य वेड्यातचं गेलं..
उसासा टाकुन मग कामाला लाग शेवटचं एकदा माझ्याशी वै-यासारखी वाग,
थोडीशी राख माझी बांधून घे..
जड झाली तर वहायला नदीवर ने,
राख नादित वाहून दे..
सगळं काही सपलं असेल,
जे झालं माझ्यासंगे तुझ्या..
ध्यानातही उरलं नसेल,
संपलेल्या खेळाचा मग तू संपून टाक डाव,
फक्त वहायच्या आधी राख..
एकदा हृदयाला लाव..
बघ,
राखेचा एक कण तुझ्या..
हातावर राहिल,
शेवटचं का होईना तुझ्याकडे आशेने पाहिल..
त्यालाही तुझा अश्रुची चव,
तू कळवणार का ?????
विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास..
जळवणार का ??????????