२/१६/२०१५

"युवकाच्या देशात युवकांच्या समस्या....."


" ये देश युवाओ का है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देश म्हटल तर ते उचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ? या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी. आणि जर या प्रश्नाचा विचार आपण केला नसेल तर आपण आपल्या देशाच्या विचारांबाबत एवढे षंढ कसे काय असु शकतो..
                            " देशाकरीता युवकांनी आपल काहीतरी योगदान दिल पाहीजे जेणेकरुन हा देश यशाची सर्वांत मोठी उंची गाठु शकेल" हे ही वाक्य बर्याच नेत्याच्या मुखातुन ऐकायला मिळत. युवकांनी आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी काहीतरी करण हे त्यांच परम कर्तव्यच आहे आणि युवक हे आपल्यापरिने आपल कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचा प्रयत्न करतील यात मात्र कवडीमात्र शंका नाही. पण युवांना या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शासनाची साथ लाभते तरी काय? हा एक मोठा प्रश्न जनसामान्यांकडुन विचारला जात आहे. युवकांना रोजगाराच्या, देशसेवेच्या वेगवेगळ्या संध्या उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परंतु सध्यातरी शासन यात यशस्वी होताना दिसत नाही आहे.
                            आज भारतात एक वेगळच चित्र पाहावयास मिळत आहे. युवक हे बरोजगारीच्या अंधारात ओढले जात आहे. ज्यामुळे युवकांना आपल्या कुटुंबासाठी , देश्यासाठी काहीही करता येत नाही या चिंतेतुन युवकांना अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. आणि यामुळेच की काय आजचा तरुन वाईट मार्गांनी भरकटत आहे. कोणी मध्यपान, वेगवेगळ्या प्रकारची नशा करुन मानसिक त्रास दुर करु पाहत आहे तर कोणी मटका वरली, जुगार खेळुन आपल्या कुटुंबासाठी पैसा कमविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण या भरकटलेल्या तरुनांना कळत नाही आहे की ते हे सारे उद्योग करुन आपल व आपल्या कुटुंबाच जिवण उद्धस्त करत आहे. आणि आमच्या भारत देशाच भवितव्य अंधारात ढकलत आहे कारण आजचे युवक हा उद्याच भारताच भविष्य आहे.
                           दारु, घुटका, सिगारेट, तंबाखु हे जिवणासाठी विष आहे सर्वांनाच माहीत आहे. या सर्वांमुळे खुप सारे मोठे आजार होतात याची जाणीव सरकारलासुद्धा आहे म्हणुनच की काय सरकारने "तंबाखु सेहत के लिए हानीकारक है" ही सुचना गुटका, सिगारेट, तबाखु च्या पॅकेटवर देण्यास सुरु केली. पण या वस्तुंवर बंदी आणण सरकारला योग्य वाटल नाही किंवा ती तसदी शासनाने घेतली नाही आहे. ज्या वस्तुमुळे आपल्या समाजाच आरोग्य धोक्यात येत आहे, देशाच भवितव्य असणार्या तरुणांच आयुष्य पोखरुन निघत आहे. थोडासा आर्थिक तोटा सहन करुन देशाच्या उज्वल भविष्यासाठी अश्या वस्तुंवर बंदी आणण्यासाठी सरकारला काय हरकत हे सामान्य मानसाच्या समजण्या पलीकड आहे.
                        स्वामी विवेकानंदजी ने म्हटले आहे की "मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर मी हा पुर्ण देश बदलवुन टाकेल." आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरुन आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एक व्यासपिठ हव आहे. भारत या देशाला सर्वात शक्तीशाली, विकसीत, सुंदर देश बनवायच असेल तर शासनाने फक्त या ध्येयाने झपाटलेल्या युवकांना योग्य मार्गापासुन भरकटु न देता त्यांच्यासाठी एक चांगल व्यासपिठ, रोजगाराच्या संध्या, उत्कृष्ट शिक्षन या प्रकारच्या इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध करुन दिल्या तर भारताला सर्वात शक्तीशाली, विकसीत होण्यापासुन कोणीही रोखु शकत नाही....

संजय रा. कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Facebook: Www.Facebook.com/sanjaykokare

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search