२/१६/२०१५

नवी क्रांती घडवायची आम्हाला


हवी आमच्या हक्काची भाकर,
नकोय तुमची भिक आम्हाला !!
हवय आमच्या मेहनतीच मोल,
नकोय लाखोचे दान आम्हाला !!

हवय शेतीला चांगल बी बियाणे,
नकोय तुमची आश्वासने आम्हाला !!
हवाय पिकाला योग्य हमीभाव,
नको नावापुरत पॅकेज आम्हाला !!

भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच,
कारण जगाची काळजी आहे आम्हाला !!
करायच भारताच नाव मोठ,
नका करु डिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !!

आम्ही नाही करणार आत्महत्या,
कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !!
आमची नका करु काळजी तुम्ही,
कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !!

संजय रा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search