आज पाऊस पडताना पाहुन कळल
देवालाही आता रडावस वाटल
खुर्चीसाठी चाललेल्या मारामारीच
देवालापण वाईट वाटल
भ्रष्टाचार करुन आलाय प्रत्येकाला माज
या सगळ्याचा मात्र होतो जनतेला त्रास
हिच खरी वेळ दाखवायला त्यांची औकात
यांना संपवायला याव सगळ्यानी एकसाथ
लागलेली कीड संपवायला असावा
प्रत्येकाचा हात
वेगळाच बदल घडवु देशातील राजकारणात
सत्ताधारी आणि विरोधी मीळुन
भाजुन घेतात त्यांची पोळी
जनतेला लढवुन एकमेकांविरोधात
हे वाजवत बसतात टाळी
आत्ता टाळी वाजवायची तुमची वेळ आहे
मतदानाचा हक्क बजावून प्रत्येकाने
देशात लोकशाही गाजवायची
अशीच सगळ्यांनी घ्यायची शप्पथ आहे
जय हिन्द जय हिन्द जय हिन्द ... हीच ती वेळ आहे...