दोन वर्षापूर्वी गाजावाजा करीत बाजारात आणलेला ‘गॅलक्सी एस-4’ या स्मार्टफोनच्या किंमतीत सॅमसंगने चांगलीच कपात केली आहे. 2013 साली गॅलक्सी एस-4 लाँच करण्यात आला होता. त्यावेळेस त्याची किंमत 41 हजार 500 रु. होती. मात्र आता याच स्मार्टफोनची किंमत फक्त 17 हजार 999 एवढी आहे.
सॅमसंग E5 आणि E7 स्मार्टफोनच्या किंमतीतही कपात
तर महिन्याभरापूर्वी लाँच करण्यात आलेले सॅमसंगचे E5 आणि E7 या दोनही स्मार्टफोनच्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे.
सॅमसंग E5 या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 19300 इतकी होती. या किंमतीत कपात झाल्याने E5 18,250 रु. उपलब्ध आहे. तर सॅमसंग E7 या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 23,000 रु. होती. त्याची सध्याची किंमत 21,300 एवढी आहे. आजपासूनच या किंमती लागू झाल्या आहेत.
गॅलक्सी एस-4 सॅमसंगच्या अधिकृत विक्रेत्यांकडे रु.17,999 उपलब्ध आहे. याआधी त्याची किंमत 21,900 इतकी होती. गॅलक्सी एस-4 या स्मार्टफोन सुरुवातीला बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला होता. 1.6 गीगाहर्त्झ क्वॉड प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आहे. अँड्रॉईड 4.2 जेली बीन सिस्टिमवर आधारित. स्क्रीन साइज 5 इंच आणि रेझ्युलेशन फूल एचडी 1920x1080 आहे. पिक्सल रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. इंटरनल मेमरी 16 जीबी तसेच 64 जीबीपर्यंत वाढवू शकतो.