१२/०६/२०१४

'स्ट्रेस मॅनेजमेंट'च्या काही साध्या-सोप्या टिप्स...




आपलं व्यक्तिगत आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य... वेगवेगळे ताण-तणाव हे आपल्यासमोर उभे राहणारच... त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना सामोरं जायला शिका... त्यामुळे, तुमच्या अर्ध्या तक्रारी दूर होतील. पण, काय काय करता येईल, तणाव रहीत आयुष्य एन्जॉय करण्यासाठी हे आज आपण पाहणार आहोत. 
आपल्या धावत्या शेड्युलमध्ये काही मागे पडत असेल तर ती आहे आपली हेल्थ... आरोग्य... होय, तुम्हालाही जर वाटत असेल की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर हीच वेळ आहे योग्य पावलं उचलण्यासाठी... 
 
व्यायामाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी... 
* तुम्ही व्यायाम करत असाल पण, तो तुमच्या शरीरासाठी लाभदायक आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 
* ताप असेल तर, व्यवस्थित झोप झालेली नसेल तर, छातीत दुखत असेल तर व्यायाम करणं टाळा.
* तुमचं शरीर काय सांगतंय ते ऐकण्याचा प्रयत्न करा... त्याचा आदर करा.   
ताण-तणापासून दूर राहा 
* तुमचा ताण - तणाव नेमका कशामुळे वाढतोय, त्यामागचं कारण जाणून आणि समजून घ्या.
* योगा, प्राणायाम  यांच्यासाहाय्यानं मन शांत राहील याची काळजी घ्या
* धुम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा
* ताण - तणावापासून दूर राहण्यासाठी पपई, संत्री ही फळं फायदेशीर ठरतात.
* दिवसाला ४-५ बदाम, पिस्ता, काजू 
* गाजर, कोबी, टोमॅटो यांसारख्या हिरव्या भाज्यांचं सलाड बनवून खाऊ शकता. जेवणाआधी काही वेळ आधी सलाड खाणं कधीही चांगलं. या भाज्या टेस्टी बनविण्यासाठी त्यामध्ये तुम्ही मध, चाट मसाला, दही यांचाही वापर करू शकता.
* कडक, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं टाळा
* ग्रीन टी किंवा ब्लॅक टी अॅन्टिऑक्सिडन्ट म्हणून काम करतात
* हर्बल टी पिणं आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.
* आलं, दालचिनी, वेलची, लवंग हेदेखील उत्तम पद्धतीनं ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी मदत करतात.
या सवयी स्वत:ला लावायलाच हव्यात
* दिवसाला १० ते १२ ग्लास पाणी पिणं योग्य ठरेल
* बाहेर पडल्यानंतर वडा-पाव, समोसा, पिझ्झा यांपेक्षा तुम्ही केळी, द्राक्ष खाऊ शकता 
* रात्री झोपण्याआधी दूध पिणं टाळा
* एका व्यक्तीला दिवसात सलग ६-७ तास झोप अत्यावश्यक आहे... झोप व्यवस्थित झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवस तुम्हाला जाणवेल.
आहारात कशाचा समावेश असावा... 
* कार्बोहायड्रेटस (कर्बोदकं) - गव्हाची चपाती, नाचणी, ज्वारी, बाजरी, विविध रंगांची वेगवेगळी फळं 
* कॅल्शिअम (प्रथिने) - अंडी, मासे, कडधान्य, दूध
* फॅट्स (चरबी) - तुमचं खाद्यतेल सतत बदलतं राहील याची काळजी घ्या..., घरी बनवलेलं तूप, लोणी
* विटॅमिन आणि मिनिरल - सलाड, बदाम, काजू, पिस्ता, शेंगदाणे कच्च्या स्वरुपात खाणं जास्त योग्य 
ऑफिसच्या शिफ्टस् सांभाळता... सांभाळता हेही शक्य आहे... 
* सकाळी लवकर घर सोडत असाल तर घरी बनवलेले पोहे, उपमा, इडली यांसारखे कोणतेही पदार्थ खाणं योग्य... बाहेरचे पदार्थ टाळा.
* सकाळी उठून न्याहारी बनवणं शक्य नसेल तर काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, मनुका यांसारखे सहजा-सहजी सोबत नेता येणारे पदार्थ जवळ ठेवा. 
* सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबू टाकून पिणं तुमच्या पोटासाठी केव्हाही फायदेशीर ठरेल.
* लसूण तुमचं रक्ताभिसरण योग्य प्रकारे सुरु राहण्यासाठी मदत करतं, त्यामुळे आहारात लसणाचा समावेश करावा.
* दिवसातून १०-१२ मेथीचे दाणे तुम्ही खाऊ शकता. यासाठी हे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी न्याहारीनंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर ते तुम्ही खाऊ शकता.
* दोन्ही वेळचं जेवण वेळेवर घ्यावं.
* रात्री उशीरा घरी पोहचत असाल तर पोट भरून खाण्यापेक्षा मूगडाळ, भात आणि तूप यावर ताव मारला तरी चालेल... त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाश्ता मात्र पोटभर करा. 



-Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search