भाकरीच्या तुकड्यापायी खेळ बाजारी मांडला
डोंबार्याचा डाव शाळापुढं मांडला
भर उन्हात उपाशी पोर दोरीवर टांगला
डोंबार्याचा जीव त्या चिमुकल्यात गुंतला
हसणार्या लोकाकडे पाहून त्याचा जीव सांडला
घेऊन अंगावर जोर ,उपाशीच तान्ही पोर
पाहून कसरत केला गावकर्यानी शोर
गर्दीतून आला एक समोर
हाती टेकवले आने दोन-चार
अंगात भरलय वार,आता जाव कस म्होर
ढोलकीच्या तालावर नाचे छोटी छकुली
भर उन्हात मांडती खेळ
दोन्ही पोर भुकेली .......