दिल्लीत टॅक्सी चालकाकडून झालेल्या बलात्कारानंतर मुंबई पोलिसही आता या बाबतीत सतर्क झाले आहेत.
मुंबईतही आता टॅक्सी चालकांची चौकशी केली जाणार आहे, मुंबईतील टॅक्सी चालकांची पार्श्वभूमी काय आहे, याची चौकशी होणार आहे, ही तपासणी ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
मुंबईत ३१ डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी रात्री उशीरापर्यंत मुंबईकर बाहेर असतात, या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यावर पोलिसांची नजर आहे. मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी ही दक्षता घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे.