१२/०९/२०१४

पुण्यात ७० वर्षे केवळ मराठी चित्रपट दाखवणाऱ्या 'प्रभात टॉकीज'च्या जागेचा करार लवकरच संपत आहे.
प्रभातनेच मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवला व नंतर ९० च्या दशकात मरणाच्या दारी उभ्या मराठी चित्रपटांना हक्काची जागा दिली.
आज मराठी चित्रपट जेव्हा पुन्हा एका नव्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे, प्रभात मध्ये लोकांची गर्दी ओसंडून वाहू लागली आहे. मल्टीप्लेक्सेस ची दारे देखील मराठी चित्रपटांना उघडली आहेत. पण त्याच वेळी प्रभात चे दार मात्र कायमचे बंद व्हायची वेळ जानेवारी २०१५ मध्ये येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज प्रभात ला वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
केवळ ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रभात वाचवायला हवे का ? नव्या युगातील मराठी चित्रपटांना आता प्रभात ची गरज उरली आहे का ? एखाद्या भाषेसाठी आरक्षित चित्रपटगृहांचा खरंच त्या भाषेतील चित्रपटांना उपयोग होतो का ? "प्रत्येक गोष्टी ला अंत आहे …" या तत्वाने प्रभात ला आपण आनंदात निरोप द्यावा का ? प्रभात साठी लोकांनी रस्त्यावर उतरावे का ? … असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले आहेत.