१२/०७/२०१४

जीमेल झालंय तुमच्यासाठी आणखीनचं सोप्पं!




जीमेलनं आपल्या युझर्सपर्यंत जास्तीत जास्त सेवा पोहचवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. आत्ताही असाच एक बदल जीमेलनं आपल्यात घडवून आणलाय.

यामुळे, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे डॉक्युमेंटस् एडिट करण्यासाठी यूझर्सना आता आपल्या जीमेल इनबॉक्स बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच, आत्ता तुम्हाला तुमच्या ऑफिसचं एखादं डॉक्युमेंट उघडताक्षणीच त्यामध्ये एडिटिंग करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. याअगोदर, मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंट ऑफलाईन एडिट करावं लागतं होतं.

म्हणजेच, डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर पेन्सिल टूल बटनासोबत एक एडिट ऑप्शनही तुम्हाला इथं दिसेल. ज्याच्या साहाय्याने तुम्ही इनबॉक्समध्येच तुमच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसशी जोडलेले डॉक्युमेंटस एडिट करून गुगल ड्राइव्हमध्ये सेव्ह करू शकता.

यापूर्वी जीमेलनं स्वत:ला गुगल ड्राइव्हला जोडून घेतलंय. ज्यामुळे, युझर्सना १० जीबीपर्यंत फाईल्स मेलच्या साहाय्यानं पाठवण्याची सुविधा मिळालीय. त्यानंतर थीम्सची सुविधाही युझर्सना उपलब्ध झाली होती. जीमेलनं आपली सुरक्षाही ध्यानात घेऊन आवश्यक ते बदल केलेत.




Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search