१२/०५/२०१४

असे काही प्रश्न असतात?



माणसाला सोडवता येणार
नाही असा कुठलाच प्रश्न असत

नाही असे

जॉन केनेडी साहेब म्हणून गेले खर ,पण

असे
काही प्रश्न असतात?
.
मराठी पेपर च्या रद्दीचा भाव
इंग्रजी पेपर पेक्षा कमी का?
.
उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत
नाही?
.
एशियाड
मधला प्रवासी सध्या एसटीतल्या माणसां
अश्या 'हुडूत' नजरे ने का बघतो?
.
तांबडा सिग्नल
पडलेला असतांना आपल्या मागचा वाहनव
का वाजवत असतो?
.
लहान बाळाशी बोलतांना मोठी माणसे
बोबड का बोलतात?
.
बशीत ओतून चहा प्यायला तर येडाच
आहे
अशा नजरेन माणसे आपल्याकडे
का पाहतात?
.
मीच म्हणून तुमच्याशी संसार
केला अशी प्रत्येक बाई
आपल्या नवऱ्याला का म्हणते?
.
आपण हॉटेलात बसल्यावर
तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखाला
का साफ करायला घेतो?
.
तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला असे
मुलाखत देणारा प्रत्येक माणूस
प्रश्नकर्त्याला का म्हणतो?
.
हॉटेलात
इडली सांभारातली शेवग्याची शेंग
चमच्याने कशी खायची?
.
गँस वर दुध ठेवलंय ,जरा लक्ष
द्या म्हणून
बायकोने सांगितल्यावर आपली नजर
चुकवून
दुध ऊतू कसं जात?
.
दोन शेजाऱ्या खूप काम पडलयं असं
म्हणत
दारात उभं राहून अर्धा अर्धा तास
का बोलत असतात?
.
अज्ञानात सुख असते असे
म्हणतांना माणूस
ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो?
.
प्रत्येक साबण स्त्रियांचे सौंदर्य
खुलवतो ,मग आजूबाजूच्या सर्व
स्त्रिया सुंदर का नाहीत?
.
जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर
हात फिरवायला बाईच का लागते?
.
अनुभवी डॉक्टर्सहि 'practice'
का करतात?
.
कॉम्प्युटर बंद करण्यासाठी स्टार्ट वर
का क्लिक करावे लागते?
.
आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर
इतर लोक कशासाठी जन्मलेत?
.
जंटलमन टारझन ला दाढी कशी नव्हती?
.
गोल पिझ्झा नेहमी चौकोनी खोक्यात
का पाठवतात?
.
बांधकाम पूर्ण
झालेल्या इमारतीलाही बिल्डींग
का म्हणतात?
.
फ्री गिफ्ट म्हणजे काय?कारण गिफ्ट
फ्रीच असतात ना?









Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search