प्रिये ती अंधारलेली रात,
होता हातात तुझा हात...
अन् सनाट वाटेवरती,
मिळाली झुळकेची साथ...
नभात होते ढग दाटलेले,
हवेत पसरले बेधुंद वारे
जुळताच नयनाशी बंध तुझ्या,
हरवले मन माझे सारे..
तुझ्या चेह-यावरती येणा-या केसांना,
सावरत होतीस तू पुन्हा पुन्हा
अन् खुप सुंदर वाटायची मला,
सावरताना त्या केसाना तू क्षणाक्षणा...
तीही काही बोलत नव्हती,
व मीही काही बोलत नव्हतो...
दोघेही फक्त होतो चालत,
अन् एकटेपण होते आमचे बोलत....