एक दिवस असं पण येईल,
माझ्या जगण्याच्या वाटेवर,
तु मला येऊन भेटशील...
अन् तुझं मन निरागसं करुन,
मनातील अबोल भावना सागंशील....
एक दिवस असं पण येईल,
तुझ्या हातात हात माझा,
अलगदपणे नकळत देशील...
अन् आयुष्याभर देईन साथ,
तुला असं मला बोलशील....
एक दिवस असं पण येईन,
त्या नीरव सागराच्या किनारी,
सोबत घेवुनी मला फिरवशील...
अन् माझ्या ओल्या आसवाना,
तु प्रेमानं त्याला पुसशील....
एक दिवसं असं पण येईल,
माझ्या गुलाबी ओठाना,
स्पर्शूनी चिबं तु भिजवशील...
प्रेमाचा असलेला नवा गंध,
माझ्या खाली हद्यात रुजवशील....!!