आजकालच्या मुलांना,
कळत नाही कस वागावं
स्वताच्या हिंमतीवर कमवून,
ताठ मानेन जगाव
मुलांना वाटत जागेवरच,
सर्व विनासायास मिळावं
आई वडीलांच्या कमाईवरच,
मौज मजा करावं
आई वडीलांना राञंदिवस,
कष्ट करून लागतं झिजावं
मुलांनीच आर्थिक छञ,
स्वताच्या हाती धरावं
प्रत्येकाला स्वताच जीवन,
स्वतालाच लागत सावराव
स्वताचे दुर्गुण ओळखुन,
वेळीच होणार्या चुकांना आवराव
हे वेळीच कळाले तर ठीक नाहीतर
"जसं कराव तसच लागतं भरावं"