१२/२७/२०१४
आमच्या क्लासमध्ये सुद्धा आहे,
एक चंद्राचा मुखडा..
जो हल्ली वाटु लागलाय,
माझ्या हृदयाचा तुकडा..!!
जिकडे तिकडे आता फक्त,
तिचाच चेहरा दिसतो..
माझ्याकडे बघुन,
गालातल्या गालात हसत असतो..!!
रोज तिची वाट पाहताना,
डोळे माझे दिपुन राहतात..
ती आली की मग,
फक्त तिच्यातच विरुन जातात..!!
कधी कधी मला वाटतं,
तिच्याशी खुप खुप बोलावं..
बोलता बोलता जरा थांबावं,
अन् तिच्या डोळ्यात डोळे घालुन बसावं..!!
म्हणतात प्रेम हे करावं लागत नसतं,
ते आपोआप होत असतं..
वेलीवरच्या नाजुक कळीचं,
जसं फुल हळुवार फुलत असतं..!!
मग माझे हे प्रेम की आकर्षण,
मला तर काहीच कळत नाही..
पण एवढं मात्र खरं की,
मन तिच्याशिवाय कुठेच वळत नाही..!!
आता तिच्याशी बोलावं कि नको,
हे मात्र एक कोडंच आहे..
मग ते कितीही सोडवलं तरी,
ते फार थोडंच आहे..!!