१२/२७/२०१४
सॅमसंगने आपला दमदार स्मार्टफोन 'गॅलक्सी नोट एज' भारतात लाँच केला आहे. नविन वर्षात या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा फोन ग्राहकांसाठी उलब्ध होणार आहे. भारतात हा स्मार्टफोन दोन रंगांत उपलब्ध मिळणार आहे. 'चारकोल ब्लॅक' आणि 'फॉरेस्ट व्हाईट' अशा दोन रंगांत हा फोन उपलब्ध असणार आहे.
गॅलक्सी नोट आपल्या 'कर्व्ह डिस्प्ले'मुळे या अगोदरच खूप चर्चेत राहिला. या कर्व्ह डिस्प्लेवर नोटिफिकेशन, व्हिडिओ प्ले बॅक, अॅप शॉर्टकट, कॅमेरा यांसारखे फिचर्स दिसणार आहेत.
'सॅमसंग'शिवाय आत्तापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये कर्व्ह डिस्प्ले बनवण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनची किंमत ६४,९०० रुपये आहे.
'गॅलक्सी नोट एज'चे फिचर्स...
५.६ इंची स्क्रिन
२५६० X ११४० + १६० पिक्सलचा कर्व्ह डिस्प्ले
२.७ जीबी क्वॉडकोर प्रोसेसर प्रोसेसर
३ जीबी रॅम
किटकॅट ऑपरेटींग सिस्टम
१६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा
३.७ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा