१२/१५/२०१४

त्याला ती खुप आवडायची



त्याला ती खुप आवडायची 

नेहमीच त्याला घाई तिला भेटायला जायची 

ति असताना तिलाच बघण 
ति नसताना तिच्या आठवणीत हरवण
तो तिला जीवापाड प्रेम करायचा
पण तिला सांगायला नेहमी घाबरायचा
ती हि रोज त्याला भेटायची 
मनातल्या गुज गोष्टि त्याला सांगायची
तिला काय आवडत, तो आवर्जुन लक्षात ठेवायचा 
तिला आवडत म्हणुन रोज एक गुलाब आणायचा
आज तिला विचारणार, तो नेहमी ठरवायचा 
रोज मनाच्या पाटिवर हाच धडा गिरवायचा 
एक दिवस ठरवले त्याने आज फैसला करायचा 
आज मनातील भावनांना मार्ग मोकळा करायचा
तो गेला नेहमीच्या ठिकाणी भेटायला 
हजारो गुलांबाचा गुच्छ त्याच्या साथीला
आज कशी नाहि आलि, एवढा वेळ झाला तरि 
हुरहुर लागली त्याच्या जीवाला कितीतरी
मनात विचाऱांचा काहुर माझला
जणु त्याच्यासाठि काळच थांबला
ती बसायची नेहमी जिथे त्याच्याशी बोलताना 
सहज लक्ष गेले तिथे, तिला आठवताना
होती एक चिठ्ठि वजा कागद तिथे 
नाव त्याचे होते चिठ्ठिवर, तो गेला तिथे 
वाचताना चिठ्ठी, अश्रुंनी कागद हि भिजला 
नव्हती आता ती ह्या जगात,जिच्यासाठि तो एवढा झिझला
" मला तु आवडतोस हे तुला कधी कळणार नाहि" 
प्रीत माझ्या मनाचि तुज्या मनी कधीच रूळणार नाहि 
वाचुन तो मजकूर, त्याच्या भावनांनाहि पुर आला
ती आता ह्या जगात नाहि,काळ हा कसा कृर आला
अजुन हि तो तिथेच तिच्या आठवणीत वावरतो 
ती पुन्हा इथेच येणार आहे, मला सांगतो.




Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search