१२/१६/२०१४

केस गळती थांबविण्यासाठी २० घरगुती उपाय



तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.
१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा
२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.
४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.
५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.
9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.
11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.
12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.
13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.
15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.
16. अळशीच्या बिया खा.
17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.
18. केसांमधून सतत हात फिरवू नये.
19. केसांना नेहमी  फणीने विंचरले पाहीजे.
20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search