तुझ्या हास्यातून ओघळले मोती
तुझ्या नजरेतून उजळल्या ज्योती
काय म्हणू तुला सांग मेनका कि उर्वशी ?...
तुझ्या कोमल कराना फुलांचाही होईल भार
तुझ्या मुखचन्द्राला पाहून चंद्रबिंब हि लाजेल
तुझ्या लाजण्याने संध्याही शरमून गेली .....
तुझ्या मोकळ्या केसांत रात्र वाटे दडली
तुझा नाजूक बांधा पाहूनि लता हि मोहरली
इंद्रधनूची कमानी
तुझ्या भूवयांवरून घडविली ...
तू चालताना माझा रोखतोय श्वास
सृष्टीही स्तब्ध झाली असा मला होतो भास
काय तुला नाव देऊ तूच सांग कमलिनी ?....
-गोदासखी..