१२/११/२०१४

तुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती



आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते. 
तुळशीच्या याच गुणांवर आकर्षित होऊन कानपूरच्या कुशवाह या व्यक्तीनं अनेक वर्ष त्यावर अभ्यास केला आणि काही वनस्पतींच्या मिश्रणानं त्यांनी तुळशी अर्क (पंचामृत) तयार केलंय. या अर्कामुळं अनेक लोकांचे आजार बरे झाले आहेत. 
ते तज्ज्ञ सांगतात की, 14 वर्षांपूर्वी तुळशीच्या झाडांचे गुणकारी उपाय मी आयुर्वेदाच्या एका पुस्तकात वाचले होते. तेव्हाच त्याबाबत शोध घेण्याचं ठरवलं. या दरम्यान उर्ध्वपातन पद्धतीनं अर्थात डिस्टिलेशनद्वारे तुळशीचा अर्क तयार केला. या अर्काद्वारे विविध आजारांवर उपचार करून रुग्णांना बरं केलंय. आपला व्यवसाय बाजूला सारत तो मुलाच्या हाती सोपवला आणि आता पूर्णवेळ लोकांना नि:शुक्ल हा अर्क वितरित करतोय, असं त्यांनी सांगितलं. 
तुळशीच्या या अर्कात पंचामृत म्हणजे रामा, श्यामा, बरबरी, कापूर आणि जंगली अशा पाच प्रकारच्या तुळशीच्या पानांचा वापर केलाय. या पानांना गरम पाण्यात टाकून उकळवून त्याचा रस काढला आणि आयुर्वेदिक वनस्पती, जडी-बुटीमध्ये मिश्रण करून अर्क तयार केला. 
या अर्कामुळं ब्लडप्रेशर, अॅसिडिटी, कोलेस्ट्रॉल, स्नायुंचं दुखणं, सर्दी-खोकला, डोकेदुखी, उलटी, अतिसार, आतड्याला आलेली सूज, कफ, चेहऱ्याचा उजळपणा वाढवणे, पिंपल्स, पांढरे डाग, कुष्ठ रोग बरा करणे, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, हृदयरोग, मलेरिया, खोकला, खाज, गाठी, दमा, डोळ्यांचं दुखणं, अल्सर, मधुमेह, मुत्र संबंधी आजार इत्यादी रोगांवर तुळस गुणकारी आहे. मात्र गर्भवती महिला आणि काही विशिष्ट आजार असणाऱ्या रुग्णांनी याचा वापर आणि प्रमाण किती हे विचारूनच करावं. 
म्हणून काळजी आणि समुपदेशनही महत्त्वाचं आहे. तुळशी अर्कावर शोध घेणारे कुशवाह म्हणतात की, सकाळी आणि संध्याकाळी दोन थेंब अर्काचं नियमित सेवन केल्यानं आजार होत नाहीत. शिवाय तुळशीची पानं चहात टाकल्यानं ते ही उपयुक्त ठरतात. 





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search