११/२४/२०१४

चावी शोधेल तुमचा मोबाईल



 तुम्ही तुमचा मोबाईल कुठे विसरलात. किंवा कुठे ठेवून निघून गेलात तसेच तो हरवला, चेष्टेत कोणी तो लपवून ठेवला असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही. अशी एक चावी आहे, ती तुमचा मोबाईल शोधून देईल.
मोटोरोला या मोबाईल कंपनीने अशी एक चावी तयार केली आहे. ती तुम्हाला मोबाईल शोधण्यात मदत करेल.
याचं नाव आहे 'किलिंक'. मोटोरोलाच्या या अनोख्या की-चैन ला तुमच्या स्मार्टफोनसोबत कनेक्ट केलं जाईल जेणेकरून तुमचा मोबाईल हरवला की तो या कि-चैनच्या उपयोगाने शोधता येईल. जेव्हा हे की-चैन हरवेल तेव्हा ते मोबाईलच्या सह्याने शोधता येईल.
या किचैन ची किंमत आहे 1500 रूपये. हे किचैन 100 फुटांच्या अंतरात काम करू शकते. ही किचैन तुम्ही मोटोरोला डॉट कॉमवर खरेदी करू शकता. 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search