११/२४/२०१४

शाओमीचा 'Redmi Note' आज भारतात लॉन्च होणार!




चीनची मोबाईल कंपनी शाओमीचा 'Redmi Note' हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. शाओमीने 5.5 इंच डिसप्ले असलेला 'रेडमी नोट' हा फॅबलेट कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. याची किंमत सुमारे दहा हजार असेल, असा अंदाज आहे.

कंपनीने याआधी 'Redmi-1S' आणि Mi-3' स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते.

ड्यूएल सिमच्या रेडमी नोटमध्ये 1.7 गिगाहर्ट्स ऑक्टा कोर प्रोसेसर असून रॅम 2GB आहे. शाओमी नोटची इंटरनल मेमरी 8 GB असून ती 32 GB पर्यंत एक्सपांड करता येऊ शकते.

या फॅबलेटमध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे तर फ्रण्ट कॅमेरा 5 मेगापिक्सेल आहे. शाओमीच्या या फोनमध्ये अँड्रॉईड 4.2 जेलीबीन ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.

कंपनीने रेडमी नोट हा शानदार फॅबलेट ई-कॉमर्स वेबसाईटवर लिस्टेड केलं आहे.

Redmi Note चे फीचर्स

- Redmi Note मध्ये 5.5 इंचाचा 720x1280 रिझॉल्यूशनचा एलसीडी डिसप्ले आहे.
- तसंच या फॅबलेटमध्ये 1.7GHz ऑक्टाकोर मीडियाटेक MTK6592 SoC प्रोसेसर आहे.
- Redmi Note मध्ये 2GB रॅम आहे.
- हा स्मार्टफोन अँड्रॉईड 4.3 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करतो.
- 13 मेगापिक्सेलच्या ऑटोफोकस रिअर कॅमेऱ्यासह यात 5 मेगापिक्सेल फ्रण्ट फेसिंग कॅमेरा आहे.
- Redmi Note मध्ये 8 GB इंटरनल मेमरी आहे, जी मायक्रो एसडी कार्डद्वारे 32GB पर्यंत एक्सपांड करता येऊ शकते.
- यासोबत Redmi Note 3G आणि वायफाय कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

-abpmajha





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search