११/१५/२०१४

मित्रांना म्हणा ‘थँक्स’, फेसबुकचं नवं फिचर्स


फेसबुक आपल्या युझर्ससाठी नेहमीच काही तरी नवनवीन गोष्टी घेऊन येत असतं, आपल्या मित्रांना नव्या प्रकारे 'थँक्स' म्हणण्यासाठी फेसबुकने एक नवं फिचर्स आणलं आहे. 'Say Thanks' हे नवं फिचर्स लाँच करण्यात आलं असून फेसबुकवर याला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. 

या फिचर्सद्वारे युझर्सना आपल्या मित्रांसाठी एक व्हिडिओ कार्ड तयार करता येणार आहे. युझर्सने व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी ही नवी क्लृप्ती फेसबुकने शोधली आहे. थँक्स फिचर्समध्ये एका थीमनुसार मित्राचे फोटो आणि पोस्ट टाकून व्हिडिओ तयार करता येणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. 

आपले मित्र आणि त्यांच्या आठवणी याविषयी आपण नेहमीच व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठीच हे नवं व्हिडिओ फिचर्स फेसबुकने आणलं असून ते चागंलच परिणामकारक असेल असाही विश्वास फेसबुककडून व्यक्त करण्यात आला आहे. व्हिडिओ तयार करुन आपल्या मित्रांच्या टाइमलाइनवर पोस्ट करता येणार आहे. या फिचर्सचा वापर करण्यासाठी या लिंकवर facebook.com/thanks जाता येईल. 

-maharashtratimes

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search