अस म्हणतात की एखादी वस्तू
वापरली नाही की ती गंजते,आणी जास्त वापरली तर झिजते...
काहीही झाल तरी गंजून किंवा झिजून शेवट तर ठरलेलाच
आहे..मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजण केव्हाही उत्तमच ना..??
मित्रांनो,
कळी उमलते , फूल बनते आपल्या संपूर्ण आयूष्यात फक्त सुगंध
देते..
अगरबत्ती जळते, स्वतःला संपवते, ती ही आपल्या संपूर्ण
आयूष्यात फक्त सुगंधच पसरवते..
चंदनाचे झाड, विषारी सापांच्या सहवासात वाढते, तरीही झिजून
झिजून फक्त सुगंध आणी शितलताच देते..
तुम्हालाही तुमच आयूष्य अस सुगंधी बनवायच असेल तर
इतरांसाठी झिजायला शिका..ते ही कसलीही अपेक्षा न करता..
लोक तुमचा फायदा घेतील, घेऊ द्या..
तुमचाच सुगंध आहे, सगळ्या जगभर पसरु द्या..
एकवेळ अशी नक्की येईल,जेव्हा देवघरातील
देवही तेव्हा तुमच्या शिवाय अपुर्ण वाटतील, तोपर्यंत थांबू
नका.. झिजत रहा, जळत रहा, तुमचा सुगंध पसरवत रहा..