जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग आणि सोनी कंपनी तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी ग्रॅण्ड निओ, गॅलेक्सी ग्रॅण्ड 2च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. तर सोनीने एक्सपेरिया झेड अल्ट्रा आणि एक्सपेरिया एम 2 ड्यूअल स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड नियो
सॅमसंगने गॅलेक्सी ग्रॅण्ड निओची किंमत तब्बल सहा ते सात हजारांनी कमी केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड निओ 18,450 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. काही काळानंतर या स्मार्टफोनची किंमत 17,100 पर्यंत कमी करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा कपात होऊन हा फोन 13,668 रुपये झाला होता. आता या फोनचे अधिकृत दर कमी झाले आहेत. गॅलेक्सी ग्रॅण्ड निओची नवी किंमत 11,997 रुपये असेल
त्याचसोबत गॅलेक्सी ग्रॅण्ड 2च्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे. गॅलेक्सी ग्रॅण्ड 2 लॉन्च झाला त्यावेळी त्याची किंमत 22,990 रुपये होती. मात्र आता या फोनच्या दरात मोठी कपात झाली आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर गॅलेक्सी ग्रॅण्ड 2 ची नवी किंमत 16,990 झाली आहे.
दुसरीकडे सोनीनेही एक्स्पेरिया झेड अल्ट्रा ड्यूएल आणि एक्स्पेरिया एम 2 ड्यूएलचे दर कमी केले आहेत. सोनीच्या ,अधिकृत वेबसाईटवर एक्स्पेरिया झेड अल्ट्रा ड्यूएल नवी किंमत 20,990 इतकी आहे. मागील वर्षी हा फोन लॉन्च झाला होता, त्यावेळी त्याची किंमत तब्बल 46,900 रुपये होती.



