व्हॉट्सअॅप या इन्स्टंट मोबाईल मेसेजिंग अॅपने नुकतीच सुरु केलेली सेवा म्हणजे 'रिड रिसीट' (होय ब्लू टीक). पण या सेवेमुळे अनेकांना मेसेज पाहिले नाहीत किंवा मेसेज वाचले नाहीत, ही कारणं देणं कठीण झालं. मात्र आता व्हॉट्सअॅपने अशा युझर्ससाठी एक गुड न्यूज दिली आहे.
व्हॉट्सअॅपचे युझर्स आता हे ब्लू टिक डिसेबल करु शकतात. यासाठी तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्जमधून जाऊन 'रिड रिसीट' हा ऑप्शन डिसेबल करावा लागेल. फक्त हा ऑप्शन ऑफ केल्यावर युझर्सनी दुसऱ्यांचे मेसेज वाचले तरी चॅट बॉक्समध्ये ब्लू टिक दिसणार नाहीत.
Settings > Privacy > Disable the ‘Read Receipts’ option
हे डिसेबल केल्यानंतर व्हॉट्सअॅप युझर्सनी मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक दिसणार नाही. हे सेवा 'लास्ट सीन'सारखीच आहे. युझर्सनी स्वत:चं 'लास्ट सीन' ऑफ केल्यावर तर त्यांना दुसऱ्यांचं 'लास्ट सीन' जसं दिसत नाही, तसंच युझर्सनी दुसऱ्यांना पाठवलेल्या मेसेजनंतर त्यांनाही चॅट बॉक्समध्ये ब्लू टिक दिसणार नाहीत.
ही सेवा एनबल करण्यासाठी युझर्सना व्हॉट्सअपचं लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावं लागेल. याचं अपडेटेड व्हर्जन 2.11.44 असून ते फक्त व्हॉट्सअपच्या साईटवर उपलब्ध आहे.
आता व्हॉट्सअपच्या या सेवेमुळे युझर्सची कोणालाही ’आन्सरेबल’ आहात या विचारातून सुटका होणार आहे.