१०/२२/२०१४

जगातील पहिला दोन स्क्रीनचा स्मार्टफोन बाजारात



: स्मार्टफोन बाजारात जबरदस्त बदल दिसून येत आहे. नवनविन तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. एका रशियन कंपनी योटा डिवाईसेसने असा एक स्मार्टफोन आणला आहे की, दोन स्क्रीनचा फोन.

आतापर्यंत दोन सिमचा स्मार्टफोन आणि जास्तीत जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा असणाऱ्या फोनची चलती दिसत होते. आता यात दोन स्क्रीनच्या फोनची भर पडली आहे. योटा कंपनीचा दोन स्क्रीनच्या स्मार्टफोनची किंमत २३, ४९९ रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करु शकता.

हा फोन बनविण्यासाठी नोकियाच्या आधीच्या इंजिनियरचा यात मोठा हात आहे. १.७ जीएचजेड डयुएल कोस प्रोसेरस आहे. या फोनच्या दोन्ही स्क्रीन ४.३ इंच आहे. या फोनच्या मागील स्क्रीन ग्रे आहे. तो नेहमी सुरुच राहतो. तर पुढील स्क्रीन आयपीएस एलसीटी १४ एम कलरचा आहे. पुढील स्क्रीनचे रिओल्युझनच्यावेळी युजरला सर्व दिसते.

हा फोन १४६ ग्रॅमचा आहे. ९.९ मीमी मोठा आहे. या फोनची बॅटरी १८०० एमएएच आहे. हा फोन अॅड्रॉईडवर चालतो. याची रॅम २ जीबी आहे. ३२ जीबीपर्यंत तुम्ही वाढवू शकता. यात ४जी, ३जी, २जी, वायफाय आणि ब्ल्युटुथ असून १३ एमीचा कॅमेरा असून फुढील कॅमेरा १ मेगापिक्सलचा आहे.


Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search