१०/२२/२०१४

तुमचा चोरी झालेला पासवर्डही शोधून काढेल फेसबुक!


 सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं आपल्या युझर्सच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी एक स्वयंचलित सेवा विकसित केलीय. याद्वारे, वेबवर निगरानी ठेवून चोर करण्यात आलेले ई-मेल आणि पासवर्ड शोधून काढणं शक्य होणार आहे.
ही सेवा युझर्सशी जोडलेल्या माहितीची चौकशी करून त्याद्वारे हे शोधून काढेल की, ही माहिती फेसबुकवर वापरली जाणाऱ्या माहितीशी मिळती-जुळती आहे किंवा नाही.
जर या सेवेला युझर्सच्या खाजगी माहितीची पत्ता लागला तर ही सेवा आकड्यांना एका प्रोग्राममध्ये रुपांतरीत करते, जी याचा कम्प्युटरच्या भाषेत विश्लेषण करते.
डेली मेलनुसार, या स्वयंचलित प्रणालीनंतर फेसबुक डॅटाबेसच्या आधारावर हे शोधून काढते ती एखादा ई-मेल किंवा पासवर्ड फेसबुकच्या लॉगइन सुचनेशी मेळ खातो किंवा नाही. 
ईमेल किंवा पासवर्ड सारख्या खाजगी आकड्यांच्या चोरीचा व्यापक परिणाम होऊ शकतो... कारण, काही लोक एकच पासवर्ड वेगवेगळ्या वेबसाईटसाठी वापर करत असतात, असं फेसबुकचे सुरक्षा इंजिनिअर क्रिस लाँग यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.  
'आम्ही भविष्यात लोकांचे फेसबुक खाते सुरक्षित करण्यासाठी एक विशेष प्रणाली विकसित केलीय.... जी त्यांच्या सार्वजनिक पोस्टवर पूर्ण सक्रियतेनं नजर ठेवेल... याद्वारे एखाद्या फेसबुक युझरशी निगडीत एखादी माहिती इंटरनेटवर आणखी कुठे आढळली तर याविषयी आम्ही त्यांना याबद्दल सूचना देऊ' असं क्रिस यांनी पुढे आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. 


Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search