८/२१/२०१४

'झोलो'चा ‘क्यू झेड 10 एस’ लॉन्च!


स्वस्त आणि बजेट स्मार्टफोनच्या यादीत आता आणखी एका स्मार्टफोनची भर पडलीय. ‘झोलो’ या मोबाईल कंपनीनं आपला नवा स्मार्टफोन ‘क्यू झेड 10 एस’ लॉन्च केलाय. 
झोलो क्यू झेड 10 एस ड्युएल सिम सपोर्ट करतो. अँन्ड्रॉईड 4.4.2 किटकॅटवर हा स्मार्टफोन चालतो. यामध्ये 480 X 800 पिक्सल रिझॉल्युशनचा 4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. 
1.3 गिगाहर्टझ क्वॉड कोअर मीडियाटेक प्रोसेसर, एक जीबी रॅम आणि माली 400 जीपीयू आहे.  
या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजुला एलईडी फ्लॅशसहीत 5 मेगापिक्सल कॅमेरा आहे. यामध्ये सीन डिटेक्शन, फेस रिकग्निशन, पॅनोरमा, जियो टॅगिंग, बेस्ट शॉट, स्माइल शॉट आणि एचडीआर यांसारखे फिचर्स देण्यात आलेत. 
स्मार्टफोनच्या पुढच्या बाजुला 0.3 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे आणि मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्यानं 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविण्यात येऊ शकते. बॅटरी 1500 एमएएमच आहे. 
कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये जीपीआरएस, एज, थ्रीजी, वाय-फाय, मायक्रो यूएसबी आणि ब्लू टूथ 4.0 यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन केवळ पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 6499 रुपये इतकी आहे. 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search