८/०१/२०१४

मुंबईसह कोकण, विदर्भ, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा




मुंबईत आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतलीये. दरम्यान पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेध शाळेनं वर्तवलाय.

गुरुवारी दिवसभर मात्र पावसानं मुंबईला झोडप झोडप झोडपलंय. त्यामुळे सखल भागांत पाणी भरलं होतं. हिंदमाता, दादर, मिलन सबवे, कॅडबरी जंक्शन पेडर रोड, बाबुलनाथ, गांधीनगर, वरळी, सरदार हॉटेल परेल, परेल टीटी, भायखळा स्टेशन, काळाचौकी, नायर हॉस्पिटल, नागपाडा, पायधुनी, वी. रा. देसाई रोड, मोरी रोड, गांधी मार्केट माटुंगा, सांताक्रुझ, विलेपार्ले या भागांत प्रचंड पाणी साचलं होतं. आहे.

गुरुवारी दिवसभरात मुंबई शहरात 79 मिमी, पूर्व उपनगरात 73 मिमी तर पश्चिम उपनगरात 59 मिमी पावसाची नोंद झालीय. दरम्यान पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेध शाळेनं वर्तवलाय.


Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search