८/०१/२०१४

मोटो G ची किंमत घसरली, फ्लिपकार्टवर 14 हजाराचा फोन आता 12 हजाराला!


मोटोरोलाच्या मोटो G या लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत चक्क दोन हजार रूपयांनी कमी झालीय. फ्लिककार्ट या मोटो जी विक्री करणाऱ्या वेबसाईटने आपल्या ट्वीटर हँडलवरून ही माहिती प्रसारित केलीय.
मोटोरोलाने भारतात मोटो जी हा बजेट फोन कॅटेगरीला स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्टसोबतच लाँच केला होता. त्यावेळीही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. फ्लिपकार्टवर मोटो जीची विक्री सुरू झाली तेव्हा तर साईटही क्रॅश झाली होती. त्यानंतर आलेल्या मोटो ई या स्मार्टफोनलाही भारतीय गॅझेटप्रेमींचा असाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच चीनच्या जिओमी या मोबाईल कंपनीने आपल्या Mi3 या स्मार्टफोनचं लाँचिंगही फक्त फ्लिपकार्टसोबत करण्याचा निर्णय घेतला.
मोटो जी च्या ऑनलाईन विक्रीच्या यशाने भारतातील स्मार्टफोन लाँचिंगमध्ये एक नवं पर्व सुरू केलंय. मोटोरोलोपाठोपाठ अनेक मोबाईल उत्पादक कंपन्या आपल्या फोनच्या विक्रीसाठी आता शॉपिंग वेबसाईटबरोबर करार करत आहेत.मोटो जी या भारतात प्रचंड लोकप्रिय झालेल्या स्मार्टफोनची किंमत आता चक्क दोन हजार रूपयांनी कमी करण्यात आलीय. आधी 13999 रूपयांना मिळणारा मोटो जी आता फक्त 11999 रूपये द्यावे लागणार आहेत. ही किंमत 16 जीबी मेमरीच्या फोनसाठी आहे. तसंच 8 जीबी मेमरीच्या मोटो जी स्मार्टफोनची किंमत तर त्यापेक्षाही कमी 10499 रूपये एवढीच आहे.

ABP Majha

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search