७/३१/२०१४

माळीन दुर्घटना: जिवंत व्यक्तींच्या शोधासाठी टेक्नॉलॉजीचा वापर


माळीण : डोंगराने गिळलेल्या माळीण गावात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) ४०० जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. हे काम दिवस-रात्र चालले तरी गावावर कोसळलेला डोंगर उपसण्यास किमान तीन दिवस लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मातीखाली जिवंत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना वाचवण्यास प्राधान्य असल्याचे दलाचे प्रमुख आलोक अवस्थी यांनी सांगितले.
जिवंत लोकांच्या शोधासाठी मानवी हृदयाच्या ठोक्यांचा वेध घेणाऱ्या आधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.  चार प्रशिक्षित श्वानांच्या मदतीनेही जिवंत माणसांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत, जेसीबी व अन्य यंत्रणाही या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. किरकोळ जखमींवर मंचर, तर गंभीर जखमींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. ससूनमध्ये जखमींसाठी वॉर्ड आरक्षित आहेत. तथापि, संततधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
ड्रोनची मदत
मदत आणि बचाव कार्यासाठी दोन मानवरहित ड्रोन आणि स्निफर श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे. डोंगरपायथ्याची १० गावे रिकामे केली जात आहेत. आवश्यकता भासल्यास तातडीने कुमक देता यावी म्हणून गांधीनगरमध्ये एनडीआरएफच्या २४० जणांची आणखी सहा पथके सज्ज आहेत.

Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search