७/२३/२०१४

''शिवचरित्र''काय शिकवते ??



१) आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा. सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

२) उठा जागे व्हा ! थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही.


३) जीवनात चढ उतार हे येत असतात. नेहमी हसत राहा.

४) अहंकारापासून तितकेच सावध रहा, जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता.

५) प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ फार वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबलाने कामाला लागा तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल.

६) कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुखिः करून घेऊ नका. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला मोकळे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्यासमोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फार थोडाच आहे. बेसावधपणे तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुखिः व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल.

७) धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा.

८) थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेत आणि त्यांच्याच वाटेचे दुसर्यांनी अनुकरण केले आहे.

९) एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्रागा करणे, कर्तव्यापासून विचलित होणे हे महा शिवद्रोह होय. एकटेपण हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्टतम शक्तींना प्रकाशात आणू शकता.

१०) आमची जिद्द आमच्या अंगी आहे का ? याकडे आपण लक्ष्य द्यावे. शिवछत्रपती कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने आत्मबल सर्वांनाच मुक्त हाताने प्रदान केले आहे. ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल.

विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search