७/२२/२०१४

अवघ्या 40 मिनिटात फ्लिपकार्टवर Mi3 आऊट ऑफ स्टॉक!



फ्लिपकार्टवर विक्रीपूर्व नोंदणीमध्येच तब्बल एक लाख रजिस्ट्रेशनचा टप्पा पार केलेल्या चीनच्या शाओमी एमआय ३ (Xiaomi Mi3) हा बहुचर्चित स्मार्टफोन अवघ्या 40
मिनिटात आऊट ऑफ स्टॉक झालाय.
 
फ्लिककार्टवर Mi3 हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाल्याचा मेसेज येत आहे. मात्र फ्लिककार्ट किंवा शाओमी यापैकी कोणीही आतापर्यंत नेमके किती फोन विकले गेले याची
आकडेवारी जारी केलेली नाही. 




एका अंदाजानुसार पहिल्या टप्प्यात शाओमीने Mi3 चे 1000 हँडसेट आयात केले होते, त्या सर्वांची अवघ्या 40 मिनिटांतच विक्री झाली आहे. शाओमीने भारतातील
विक्रीसाठी शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टसोबत एक्स्लुझिव्ह टायअप केलं होतं. त्यानुसार शाओमी Mi3 हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे. यापूर्वी मोटोरोलाने
Moto G आणि Moto E या दोन्ही फोनसाठी फ्लिपकार्टसोबत असाच करार केला होता. मोटो जी आणि मोटो ई या दोन्ही फोनलाही भारतीय ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला होता.
Mi3 च्या खरेदीसाठी आज फ्लिककार्टच्या साईटवर एकच गर्दी केल्यामुळे फ्लिपकार्टची साईटही बंद झाली. फ्लिपकार्टच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्याबद्धल दिलगिरीही
व्यक्त करण्यात आली.

ग्राहकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे फ्लिपकार्टची साईट क्रॅश झाल्यामुळे Mi3 च्या विक्रीसाठी 40 मिनिटे लागली, अन्यथा त्यापेक्षाही कमी वेळेत सर्व स्टॉक आऊट ऑफ
स्टॉक झाला असता, असं जाणकारांना वाटतं. कारण मोटो जी आणि मोटो ई च्या खरेदीच्या वेळी आलेल्या अनुभवामुळे फ्लिपकार्टने यावेळी आधीपासून विक्रीपूर्व नोंदणी
अनिवार्य केली होती. तब्बल एक लाख ग्राहकांनी आधीच रजिस्ट्रेशन केल्यामुळे शाओमीच्या Mi3 या स्मार्टफोनला किती मोठा प्रतिसाद मिळू शकतो, याचा अंदाज
फ्लिपकार्टला आला असला तरी त्यांनी त्यादृष्टीने काहीच पूर्वतयारी केली नसल्याचं दिसून येतंय.

शाओमीच्या Mi3 च्या लेटेस्ट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असे आहेत. आज मितीला फक्त बड्या ब्रँडच्या हायएन्ड स्मार्टफोनमध्येच असे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
आहेत.

Mi3 ची लांबी-रूंदी (मिमीमध्ये) 144.00 x 72.00 x 8.10
वजन (ग्रॅममध्ये) 145.00
बॅटरी क्षमता (mAh) 3050
डिस्प्ले स्क्रीन साईज (इंच)  5.00
स्क्रीन रिझोल्यूशन 1080x1920 pixels
पिक्सेल पर इंच (पीपीआय) 441
प्रोसेसर 2.3GHz  quad-core
प्रोसेसर कंपनी Qualcomm Snapdragon 800 8274AB
रॅम (RAM) 2GB
फोन स्टोरेज 16GB
कॅमेरा (Rear) 13-megapixel
(Front) 2-megapixel
ऑपरेटिंग सिस्टीम Android 4.4

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search