६/२५/२०१४

कोट्यवधींची कमाई करणाऱ्या साई संस्थानाची शिर्डी भकास





देशात सध्या सर्वाधिक कमाई करणारं साई संस्थानाचं शिर्डी शहर सध्या भकास होतंय. मुलभूत आणि पायाभूत सुविधांची वाणवा असल्यानं पर्यटक हैराण झालेत. साई संस्थान मात्र नफ्या तोट्याचं गणित जोडण्यात दंग झालंय.
शिर्डीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे पाहून रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ते? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झालीय. रोजची एक ते दीड कोटी कमाई असलेल्या साई संस्थानसमोरील रस्त्याची अशी दयनीय अवस्था. एकीकडे चकाचक संस्थान परिसर. साई मंदिराच्या भिंतीही सोन्यानं मढवलेल्या. मात्र साईनगरी शिर्डीतल्या रस्त्यांची ही अशी दूरवस्था. आश्चर्याची बाब म्हणजे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या संस्थानच्या कारभाऱ्यांना याचं सोयरंसूतक नसल्याचा आरोप इथं येणारे पर्यटक आणि शिर्डीचे नागरिक करतायेत.
रस्त्यांची अशी दूरवस्था असताना सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालयाची कोणतीही सोय नाही. महिलांसाठी आवश्यक सोयीसुविधा शिर्डीत कुठंही नाही. काहींनी तर शिर्डीतल्या सुविधांपेक्षा शेगाव लाखपटीनं बरं अशा प्रतिक्रिया दिल्यात. 
किलो किलो सोन्या चांदीचं दान... कोट्यवधीच्या देणग्या.. दिवसागणिक साई मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपये जमा होतायत. मात्र बक्कळ कमाईत मश्गुल असलेलं साई संस्थान कोट्यवधीचं दान देणाऱ्या पर्यटक आणि भक्तांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलंय. सारं आयुष्य भक्तांसाठी जगणाऱ्या साईंच्या शिर्डीत देवधर्माच्या नावाखाली भक्तीचं व्यावसायिकरण होतंय याहून मोठं दुर्दैव ते कोणतं.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search