६/२५/२०१४

फेसबुकनं केलं 'स्नॅपशॉट' सारखं 'स्लिंग्जशॉट' अॅप लॉन्च

फेसबुकनं केलं 'स्नॅपशॉट' सारखं 'स्लिंग्जशॉट' अॅप लॉन्च


फेसबुकनं 'स्लिंग्जशॉट' नावाचं नवं अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे यूजर्स आपले फोटो आणि व्हिडिओ सहज शेअर करू शकतील. स्नॅपशॉट हे यापूर्वीचं फेसबुकनं अॅप लॉन्च केलंय. 
स्लिंग्जशॉट अॅपच्या माध्यमातून तुम्ही फोटो , व्हिडिओ शूट, त्यात माहितीही टाकता येते. शिवाय त्यात रंगही भरता येतात. मग तो फोटो/व्हिडिओ तुम्ही मित्रांना 'sling' करू शकता. जे तुमचे मित्र हे बघू शकतील मग ते तुम्हाला सुद्धा दुसरं sling पाठवू शकतात. 
'स्लिंग्जशॉट' हे अॅप आजपासून  iPhones (iOS7) आणि अँडॉईड स्मार्टफोन (Jelly Bean आणि KitKat) वर उपलब्ध झालंय. 
फेसबुकनं मागील वर्षी स्नॅपशॉट हे अॅप लॉन्च केलं होतं. या अॅपद्वारे यूजर्सनं पाठवलेला मॅसेज काही सेकंदांनी आपोआप नाहीसा  व्हायचा.  यापूर्वी 2012मध्ये फेसबुकनं फोटो शेअरिंग सर्व्हिस Instagram आणलं होतं. 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search